पोस्ट्स

इमेज
#तरुण_भारत_संपादकीय #संकटराव_आणि_संपतराव ★★★★★★★★★★★★★★★★★ http://www.tarunbharat.com/news/609590 सांगली जिल्हय़ातील पाणी चळवळीचे एक जुने जाणते नेते संपतराव पवार यांच्या ‘मी लोकांचा सांगाती’ या आत्मवृत्ताचे प्रकाशन रविवारी झाले. संपतरावांनी जिद्दीने साकारलेल्या देशातील क्रांतिकारकांच्या एकमेव स्मृतीवनात, बलवडी ता. खानापूर येथे ते पार पडले. दुष्काळ, नापिकी, पाण्याची कमतरता, वाहून जाणाऱया पाण्याचा प्रश्न अशा समस्यांवर शाश्वत उपायाची उदाहरणे समाजासमोर ठेवणारे संपतराव प्रथमच पुस्तकाच्या रूपाने व्यक्त झाले. श्रावणसरींच्या साक्षीने हा समारंभ होत असताना वैचारिक श्रावणाचाही हा मोसम असल्याचे जाणवत होते. या काळात सर्वत्र चर्चा होती ती साधकांच्या घरात दहशतवादविरोधी पथकाला सापडलेल्या बॉम्बची आणि त्या साखळीतच एका पाठोपाठ एक एक हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते सापडत असल्याची. विशिष्ट घडामोडींमुळे देशासमोर संकट उभे आहे असे सतत सांगत युवकांना भरकटवणारे संकटराव एकीकडे आणि शाश्वत विकासाच्या पर्यायांची मालिका उभी करून युवकांना विकासकार्यात गुंतविणारे आणि या मार्गाने चला असा अबोल संदेश देणारे संपतराव...

मी लोकांचा सांगाती

इमेज
आग्रहाचे निमंत्रण......
इमेज
आग्रहाचे अवाहन..... स्वातंत्र्य चळवळीतील ध्येयवाद,राष्ट्र उभारणीच्या प्रखर प्रेरणेची किनार माझ्या आयुष्याला बालपणापासून मिळत गेली.शालेय जीवनात पुरोगामी विध्यार्थी संघटना आणि शे.का.पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जन चळवळीत सक्रीय राहिलो.१९७२ साली विधानसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी अंगावर आली.या निवडणुकीला विध्यार्थी-युवकांनी उठावाचे स्वरूप आणले.मोठ्या विश्वासाने साथ दिली.तो विश्वास सार्थ ठरावा म्हणून प्रत्येक अडचणीत त्यांच्याबरोबर राहिलो.काही प्रश्न निर्णायक लढवले.काही प्रश्नाबाबत धोरण स्वीकारावे लागले.पन्नास वर्षाहून अधिक काळ सातत्याने झुंजत राहिलो मात्र १९७७ नंतर डावी पुरोगामी,परिवर्तनवादी चळवळ क्षीण क्षीण होत गेली.त्याची कारणे शोधण्याची गरज जाणवू लागली.चळवळ हे माझे एकट्याचे काम नाही.जे काही घडत गेले त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील किमान शंभर हून अधिक शे.का.पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.चळवळीतील खरीखुरी शक्ती तीच होती.या चळवळीचा वृतांत लोकांपुढे सादर करावा.काय चुकलं ते शोधावं.या उद्धेशाने हा प्रवास प्रकाशित करत आहे. पुस्तकाचे प्रकाशन करताना आज चळवळीतील सर्वांची आठवण ये...
*जाहीर निमंत्रण* इनामीजमीन,घरासाठी जागा,व बजेट या मूद्द्यावर  सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. *शूक्र*दि. २२ व शनि. २३ जून रोजी (स.११ ते ५) दोनदिवसीय निवासी प्रशिक्षण बलवडी (भा) येथे होत आहे* सांगली जिल्ह्यातील वतनी जमीनी  महार व रामोशी),गायरान जमीन,कूळकायदा,देवस्थान जमीन ,मूलाणकी,फॉरेस्ट जमीन किंवा अतिक्रमण जमीनी विषयातील अनूभवी तज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.तरी या प्रशिक्षणासाठी आपण निमंत्रित आहात. संयोजक :अग्रणी सोशल फौंडेशन, विटा *स्थळ- क्रांती स्मृतीवन बलवडी ( भा) ता.:खानापूर जि. सांगली* ( विटा - कूंडल रोड)* संपर्क: *सूनीलभाऊ लोंढे* कार्यशाळा समन्वयक, :८४११८१५६७६
इमेज