लाख मोलाची शाल....
गरीब या शब्दातली वेदना,दुःख समजायला गरिबीतच जगावं लागतं. गरिबांनी स्वप्न बघावी,ती साकार करताना जळावं ही वाटते तितकी सोपी लढाई नाही.पण काही असामान्य माणसं परिस्थितीच्या उरावर बसून तिची पाठ लावतात. महाराष्ट्र केसरी पै नारायण साळुंखे हा त्यातलाच एक पठया..! तसं बघायला गेलं तर गरीब आणि पैलवान हे दोन विरुद्ध अर्थी शब्द.पण दादांनी या शब्दानाच समानार्थी बनवलं. सबंध आयुष्याची तालीम झाली तरी त्यांनी आखाडा सोडला न्हाय.आता पलूस तालुका कुस्ती संघ स्थापन करून नव्या पोरांना शिकवायचं ठरवलं पण दुर्दैवाने त्यांना कायद्याच्या कटकटीत अडकवल गेलं.माझ्यासारख्या खारीचा हातभार लागला आणि ते निसटले.मी मोबदला घेता घेत नाही म्हणून आज त्यानी पैलवान डाव टाकला.फुल नाही तर फुलांचा अख्खा दस्ता आणि अंगावर शाल टाकून आभार मानले.!
पण मित्रानो मला ती शाल महाराष्ट्र केसरीच्या गदे इतकीच जड वाटली.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा