शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

छावणी मुक्त महाराष्ट्र

दै.सकाळ।21022021

वैरण उत्पादन व साठवणूक प्रकल्प

सस्नेह निमंत्रण । अगत्य यावे...

छावणी मुक्त महाराष्ट्र

छावणी मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू..!
मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उगम फौंडेशन च्या वतीने आज 'छावणी मुक्त महाराष्ट्र' अभियाना चा प्रारंभ कार्यक्रम उत्साहात बलवडी येथे पार पडला. यावेळी मा.डॉ.किरण पराग (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), मा.डॉ.संजय धकाते (पशुसंवर्धन उपायुक्त) मा.श्री संतोष भोर साहेब प्रांत विटा, मा.श्री ऋषीकेत शेळके तहसीलदार विटा, मा.डॉ.प्रा.गोरखनाथ किर्दत,मा. प्रा अनिल पाटील,मा. श्री विलास चौथाई इत्यादी मान्यवर व बलवडी येथील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
@ क्रांतीवन 20022021

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

छावणी मुक्त महाराष्ट्र

बलवडीत शाश्‍वत, सकस चारा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प 
https://www.esakal.com/paschim-maharashtra/pioneering-project-sustainable-nutritious-fodder-production-balwadi-409463
source: "सकाळ"

छावणी मुक्त महाराष्ट्रासाठी...

 छावणी मुक्त महाराष्ट्रासाठी...
सकाळ।15022021

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

चारा छावणी मुक्त महाराष्ट्र

चारा छावणी मुक्त महाराष्ट्र प्रकल्पाची सविस्तर माहिती घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी  प्रा.ए.डी.जायभाय (एन.एस.एस प्रमुख शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) व प्रा.गोरखनाथ किर्दत यांचे पथक पाठवून या उपक्रमात रस दाखवला.
या प्रसंगी या पथकासमोर प्रकल्पाचे द्रक-श्राव्य प्रदर्शन करण्यात आले.
090222। क्रांतीवन

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

'चारा छावणी उच्चाटन परियोजना'

महाराष्ट्रात दरवर्षी कुठे न कुठे दुष्काळ पडत असतो. प्रत्येक दुष्काळात चाराटंचाई वर उपाय म्हणून चारा छावणी उघडली जाते.परंतु चारा छावणी चा उपाय सर्वर्थाने घातक ठरत आहे. म्हणूनच चारा टंचाईच्या काळात चारा छावणी च्या ऐवजी चारा छत्र ही चारा पुरवू शकणारी संकल्पना उगम फौंडेशन बलवडी या सेवाभावी संस्थेच्या वतीने राबवण्यात येत आहे.
सम्पूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकणारा दुष्काळ आपत्ती व्यवस्थान प्रकल्प उगम फौंडेशन या संस्थेच्या वतीने साकारण्यात येत आहे.
हा महत्वकांक्षी प्रकल्प 'चारा छावणी उच्चाटन परियोजना' अंतर्गत एकाच वेळी अनेक स्तरावर कार्यरत राहील.
या योजनेचा एक भाग म्हणून उगम फौंडेशन बलवडी या संस्थेच्या वतीने दि. 01022021 रोजी बलवडी येथील ग.नं.135 मधील दहा एकरावर  मका उत्पादन प्रारंभ कार्यक्रम पार पडला.
संभाव्य दुष्काळाला तोंड देण्यासाठी तीनशे टन वैरण साठा तयार ठेवण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने करण्यात आलेला आहे.
दि.01022021