शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

शेतकरी कार्यशाळा

क्रांतीवनात शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..
@ 18।19 नोंहेबर 2019
प्रधानमंत्री क्रुषी कौशल्य योजने अंतर्गत मे 2019 मध्ये क्रांतीवनात 200 शेतक-याना राज्य शासनामार्फत शेती पुरक व्यवसायासाठी व गट शेतीसाठी तीन दिवशीय शिबीर आयोजीत करणेत आले होते त्या अनुषंगाने बलवडीतील काही शेतक-यानी farmer  producer company स्थापन करून  दि. 18 व 19 नोव्हेंबर रोजी क्रांतीवनात कार्यशाळा आयोजीत केली. सदर ट्रेनिंग मध्ये हळद प्रोसेसींग , लाकडी घाणा व शेळी पालनाचे प्रशिक्षण दिले

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

krantiveer 21112019

क्रांतीवणाच्या प्रवेशद्वारतील कॉ गोविंदराव पानसरे अण्णांच्या रुपात आलेले हे रसरशीत लिंबू
कुणावर तरी नावावरून उतरून टाकण्यापेक्षा
माझा वापर .....
दाभोळकरांनी सांगितल्याप्रमाणे विवेकाने करा
असंच सुचवत असतील...!
21112019@क्रांतीवन,बलवडी

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

कर्मयोगी बाबा आमटे टायर बंधारा,पेठ

समाजभान अभियान अंतर्गत उगम फौंडेशन बलवडी व महारोगी सेवा समिती आनंदवन यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीळगंगा नदीवर मौजे पेठ येथील दुथडी वाहणाऱ्या टायर बंधार्याचे विहंगम  दृश्य पाहाताना कामेरीतील भीमराव अण्णा से.सह.सोसायटीचे माजी चेअरमन आकाराम चंद्रोजी पाटील....

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

krantivan 2 Nov 2019

क्रांतिस्मृतीवनास रत्नागिरीच्या विदयार्थ्यांची भेट.....
रत्नागिरी येथील बाबूराव जोशी गुरूकुल अकॅडमीच्या 50 विदयार्थ्यांनी क्रांतीवणास भेट दिली.पं.विष्णू दिगंबर पलूसकर माध्य.याप्रसंगी विदयालयातील इतिहास शिक्षक व बालभारती,पुणे इतिहास विषय राज्य कमिटीचे सदस्य मा.बाळासाहेब चोपडे, वासुदेव परांजपे व सौ कशाळकर मॅडम होत्या.
@ 2 नोंहेबर 2019