मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
जलशक्ती पुरस्कार
अग्रणी नदी पुनरुज्जीवन
सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामास भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा नदी पुनर्जीवनाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दीडशे वर्षापूर्वी वाहती नदी असलेली अग्रणी नदी लुप्त झालेली होती.भाई संपतराव पवार यांनी ही नदी पुनरुज्जीवित करण्याची कल्पना सर्वप्रथम मांडली. जलबीरादरीचे मा.सुनील जोशी यानी या कल्पनेला उचलून धरले. मा. विलास चौथाई व भाई संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बलवडी व बेणापूर गावच्या लोकांनी लोकवर्गणीतून धरणे बांधून अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे मा.शेखरजी गायकवाड यानी या उपक्रमात झोकून दिले आणि शासकीय खर्चातून हा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वी केला.
आज हजारो शेतकरी या प्रकल्पामुळे आनंदीत झाले आहेत.!!
https://youtu.be/ZM2G6JEz7Mg
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)