शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

क्रांतीवन भेट

प्रांताधिकारी मा. संतोष भोर, तालुका आरोग्य अधिकारी मा. अनिल लोखंडे व अमृतवेलचे संपादक धर्मेंद्र पवार यांची क्रांती स्मृतीवनाला सदिच्छा भेट
@25122020
(छा.सौजन्य दत्तात्रय संकपाळ)

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

जलसंवर्धन कार्य पोचपावती..

भारत सरकारचा  'राष्ट्रीय जल पुरस्कार' अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्यास जाहीर

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

जलशक्ती पुरस्कार

अग्रणी नदी पुनरुज्जीवन
सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामास भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा नदी पुनर्जीवनाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दीडशे वर्षापूर्वी वाहती नदी असलेली अग्रणी नदी लुप्त झालेली होती.भाई संपतराव पवार यांनी ही नदी पुनरुज्जीवित करण्याची कल्पना सर्वप्रथम मांडली. जलबीरादरीचे मा.सुनील जोशी यानी या कल्पनेला उचलून धरले. मा. विलास चौथाई व भाई संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बलवडी व बेणापूर  गावच्या लोकांनी लोकवर्गणीतून धरणे बांधून अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे मा.शेखरजी गायकवाड यानी या उपक्रमात झोकून दिले आणि शासकीय खर्चातून हा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वी केला.
आज हजारो शेतकरी या प्रकल्पामुळे आनंदीत झाले आहेत.!!
https://youtu.be/ZM2G6JEz7Mg

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

Delhi coverage

Baliraja Dam..His glamar yet maintain in water conservation policy..

Mrs Poshali goel on the behalf of Social and Political Research (which analyzes India's water policies) taking note over Baliraja Dam.. @15102020
Thanks for team SPRF

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

टायर बंधारा @15102020

हाऊसफुल..
कर्मयोगी बाबा आमटे टायर बंधारा पेठ
(महारोगी सेवा संस्था वडोदरा यांच्या वतीने व उगम फौंडेशन मार्फत बांधण्यात आलेला नाविन्यपूर्ण बंधारा)
@15102020

मंगळवार, ३ मार्च, २०२०

पदवीदान समारंभ

संपतराव पवार यांच्या हस्ते पदवीदान समारंभ..
तासगाव : येथील डॉ.वसंतदादा पाटील महाविद्यालय व‌ संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्या हस्ते 2018।19 च्या पदवीधरांना पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.@03032020

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

क्षेत्र भेट

शैक्षणिक क्षेत्र भेट...
इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, भिलवडी. मुख्याद्यापिका कु. विद्या टोणपे, सौ. किर्ती चोपडे, सौ. रेणुका रोटीथोर , सौ. उज्वला हजारे, सौ. सीमा पाटील, सौ. शिल्पा देशपांडे, श्री. सुनील ऐतवडे  व श्री. धीरज सूर्यवंशी. इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थ्यिनीनी क्रांतीवणाला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.
12022020

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

शिबीर

हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीची इं .5 वी ते 9 वी पर्यतची क्षेत्र भेट व सामुदायिक वनभोजन उपक्रम सोमवार दि .03-02-2020 रोजी क्रांती वन बलवडी येथे संपन्न झाला.श्री मंगेश माने सरांनी मुलांना क्रातीवनाविषयी माहीती सागितली .

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

क्रांतीवन शिबीर

क्रिएटिव्ह टीचर्स फोरम,कोल्हापूर यांचे शिबीर क्रांतीवनात संपन्न..
मा.दीपक जगदाळे सर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या शिबिरात प्रसिद्ध इतिहास संशोधक मा.सदानंद कदम यांनी शिवचरित्र,सुभाषबाबू चरित्र याविषयी उदबोदक मार्गदर्शन केले.याप्रसंगी मा.जयसिंग कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
02022020। क्रांतीवन बलवडी

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

प्रात्यक्षिक केंद्र

मनःपूर्वक आभार...!
मा.डॉ.राजेंद्र जगदाळे,महासंचालक सायन्स अँड टेक्नॉलॉजि पार्क पुणे यांनी पंधरा ते सोळा लाख रुपयांची अपारंपरिक ऊर्जा प्रात्यक्षिक उपकरणे उगम फौंडेशन या संस्थेला भेट दिली.
आता या साहित्याचा वापर करून त्यांच्याच मार्गदर्शनानुसार क्रांतीवनात 'म. विठ्ठल रामजी शिंदे स्मृती अपारंपारिक ऊर्जा प्रात्यक्षिक केंद्र' सुरू करण्याचा मानस आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे केंद्र ज्ञान पर्वणी ठरेल !
डॉ जगदाळे साहेब यांचे पुनश्च आभार..!!
आपण सूचना,सहकार्य व मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती....