रविवार, १५ एप्रिल, २०१८

उपेक्षितांचे प्रतिनिधित्व करणारी दलित चळवळ...
उद्या विट्यात करीत आहे एका उपेक्षिताचा सत्कार....

सोमवार, ९ एप्रिल, २०१८

Battle Against Poverty....
हे आहेत आमच्या दुष्काळ विरोधी युद्धातले 'संताजी-धणाजी..' आणि हा त्यांचा पराक्रम.!
दुष्काळी भागात जन्माला आलेल्या लाखो कुटुंबाना निसर्गानं वाऱ्यावर आणि सरकारनं नशिबावर सोडलं ! या गरीब,कष्टकरी कुटुंबांच्या दये पोटी हजारो कोटी रुपये खर्चून इथं पाणी आलं.पण राज्यकर्त्यांनी हे पाणी निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन एकराला नव्वद लाख लिटर पाणी लागणाऱ्या उसासारख्या पिकाला प्रोत्साहन देऊन सम्राटांना पोसण्यासाठी वापरलं.एका बाजूला भांडवलंदाराला गब्बर आणि गरीबाला भिकारी बनवणारी विकासाची ही नीती आणि दुसऱ्या बाजूला दिव्यांचा झगमगाटातली काँक्रीटच्या जंगलातली माणसं सगळ्यांचाच विकास झाल्याच्या धुंदीत असताना....
याच विकासाचा टेम्भा मिरवणाऱ्या रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीत धनाजी मंडले आणि रघुनाथ मंडले ऊस ओढत होते.परमेश्वराने याना डोंगरावर जन्माला घातलं.वीज,रस्ता नसणाऱ्या दुर्गम ठिकाणी नशिबानं जमीन आणि डोळ्यात तेव्हढंच पाणी दिलं..!!
आपल्यासारख्या सहकाऱ्यांनी हाक दिली आणि हे संताजी-धनाजी या गरिबीविरुद्धच्या लढाईत घुसले.डोंगर फोडून काढला.परिस्तिथीवर तुटून पडले.वाट्याला आलेल्या निसर्गाला शरण जाऊन निसर्गानेच सुचविलेला मार्ग धरला.दुष्काळाला पूरक अशा डाळिंबाची बाग लावली.जीव तोडून जपली.लाडक्या लेकराला मांडीवर घेऊन चमच्याने भरवावं तस यानी या डाळिंबाला पाणी पाजलं.दैव लाजलं!कष्टाला फळ आलं!!
केवळ पंच्याऐंशी हजार लिटर पाणी वापरून त्यांना डाळिंबाचे एक लाख रुपये उत्पन्न मिळाले आणि सात पिढ्यात पहिल्यांदा यांची पोरं बाळं यंदा शाळेत गेली....
एक लाख लिटर पाण्याची खात्री दिल्यानं अशी अनेक कुटुंब आपण कायमची सुखी समाधानी,आनंदी आणि स्वावलंबी करू शकलो आहोत.
या आता आपण मिळुन...
नशीबाच्या फेऱ्यात अडकलेल्या गरिबांच्या पदरात दान टाकून त्यांना पांगळ बनवण्यापेक्षा राबणाऱ्या अशा लोकांना मदत करून त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम बनवूया...
दुःख,दारिद्र्यात पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्यांची काळजी घेऊया....
Helping one person might not be change the whole world but it could change the world of one person.!!
आ.अँड.संदेश पवार
समन्वयक,उगम फौंडेशन, बलवडी.8888498088 krantivan.com/ugamfoundation@gmail.com




रविवार, १ एप्रिल, २०१८