शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

#तरुण_भारत_संपादकीय
#संकटराव_आणि_संपतराव
★★★★★★★★★★★★★★★★★
http://www.tarunbharat.com/news/609590

सांगली जिल्हय़ातील पाणी चळवळीचे एक जुने जाणते नेते संपतराव पवार यांच्या ‘मी लोकांचा सांगाती’ या आत्मवृत्ताचे प्रकाशन रविवारी झाले. संपतरावांनी जिद्दीने साकारलेल्या देशातील क्रांतिकारकांच्या एकमेव स्मृतीवनात, बलवडी ता. खानापूर येथे ते पार पडले. दुष्काळ, नापिकी, पाण्याची कमतरता, वाहून जाणाऱया पाण्याचा प्रश्न अशा समस्यांवर शाश्वत उपायाची उदाहरणे समाजासमोर ठेवणारे संपतराव प्रथमच पुस्तकाच्या रूपाने व्यक्त झाले. श्रावणसरींच्या साक्षीने हा समारंभ होत असताना वैचारिक श्रावणाचाही हा मोसम असल्याचे जाणवत होते. या काळात सर्वत्र चर्चा होती ती साधकांच्या घरात दहशतवादविरोधी पथकाला सापडलेल्या बॉम्बची आणि त्या साखळीतच एका पाठोपाठ एक एक हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते सापडत असल्याची. विशिष्ट घडामोडींमुळे देशासमोर संकट उभे आहे असे सतत सांगत युवकांना भरकटवणारे संकटराव एकीकडे आणि शाश्वत विकासाच्या पर्यायांची मालिका उभी करून युवकांना विकासकार्यात गुंतविणारे आणि या मार्गाने चला असा अबोल संदेश देणारे संपतराव दुसरीकडे अशा रितीनेच या घटनांकडे पहावे लागेल. अर्थात संपतरावांचे कार्य फार प्रसार पावलेले नाही. त्या त्या भागात त्याचा बोलबाला असला तरी  इतके मोठे कार्य जगाच्या नजरेत भरेल असे पुढे आलेले नाही. हे कष्टप्रद कार्य आहे. त्यासाठी मान, अपमान स्वीकारावे लागतात, खांद्याला झोळी बांधावी लागते आणि आपल्या कार्याचे श्रेय हे तुमचेच आहे, तुम्ही लोक एकत्र आला म्हणून हे घडू शकले असे सांगून लोकसहभाग वाढवत फिरावे लागते. प्रसंगी स्वतःला मातीत गाडून घ्यावे लागते, काळाच्या आगीत तावून, सुलाखून आणि पुरते करपून बाहेर यावे लागते. जखमी मनावर नव्या उमेदीचे, नव्या उद्दीष्टांचे मलम फासून पुन्हा चालत रहावे लागते. संतपराव होण्यासाठी हे करावे लागते. संकटराव होण्यासाठी तसे नसते. परिस्थिती येईल तसे भडक, विध्वंसक आणि ध्रुवीकरणाचे बोल बोलत राहिले की हिरवा, भगवा, लाल दहशतवादी मिळवता येतो. अर्थात रंग हेही ध्रुवीकरणच. तो फक्त दुसऱयाला शत्रू म्हणून उभा करतो. परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा शांत, संयमी परिसरातील काही घराघरात दिसू लागला आहे. पूर्वी पंजाब, आसाम, बंगाल, काश्मिरची चिंता वाहिली जायची. आता इथली सुशिक्षितांची मुले बाँब बनवल्याच्या आरोपाखाली अटकेत जात आहेत. काही स्फोटात मेली आहेत. काहींवर विचारवंतांच्या खुनाचे दोषारोपपत्र दाखल झालेले आहे. आभासी संकटांनी आपले जीवन असे व्यापण्यास सुरुवात झाली आहे. 1970 च्या दशकात आलेल्या दुष्काळांमुळे महाराष्ट्रात अनेक प्रयोग झाले. त्यातीलच बळीराजा धरण हा समान पाणी वाटपाचा एक प्रयोग होता. शेकापक्षाचे कार्यकर्ते असलेले संपतराव पवार या धरणाच्या कामातून समाजापुढे आले. दुष्काळाचे आव्हान पेलण्यासाठी सुकाळी आणि कमी पावसाच्या भागात शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वैरण उत्पादन, दुष्काळी शेतकऱयांची जनावरे सुकाळी शेतकऱयांना संकटकाळापुरती दत्तक देऊन जगवणे, मैत्र जिवा चारा अशा प्रयोगांनी संपतरावांनी सरकारवर अवलंबून न राहता, लोकांनी स्वतःच स्वतःच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे यशस्वी पर्याय पुढे ठेवले. उपसा जलसिंचनच्या कोटय़वधीच्या खर्चाला आणि अवैज्ञानिक सरकारी उपक्रमांना पर्याय म्हणून त्यांनी दुष्काळी भागात बंधाऱयांची माळ लावली. कालौघात लुप्त झालेल्या अग्रणी नदीवर काठाच्याच दुष्काळी शेतकऱयांना राबायला लावून सरकारी खर्चाच्या तरतुदीच्या निम्म्याहून निम्म्या इतक्या कमी स्वखर्चात जनतेने उभारलेल्या या बंधाऱयांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर संपलाच पण, लुप्त झालेली अग्रणी नदी जिवंत केली. शिराळय़ात कोकणासारखा पडणारा पाऊस वाहून जातो. तिळगंगा नदीवर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पेठ गावात भंगार टायरपासून बंधारा बांधून ती नदीही जिवंत केली. हे सारे प्रयोग खरेतर शासनाने स्वीकारले पाहिजेत आणि त्याची राज्यातील विविध विभागाच्या गरजेनुसार धोरण म्हणून अंमलबजावणी झाली पाहिजे. पण, कमी खर्चात आणि लोकसहभाग असल्याने आजच्या टेंडरधार्जिण्या काळात ते उचलून कोण धरणार? त्यामुळे जलयुक्त शिवारातही या प्रयोगांना पुरेसे स्थान मिळणे मुश्किलच. साधा उल्लेखही टाळला जातो. संपतराव स्वतः डाव्या विचाराचे पण आपल्या कार्यात त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेतले. त्यांच्या कार्याचे कौतुक त्यांच्या शेतकरी कामगार पक्षालाही नाही. काँग्रेस, भाजप या सरकारी पक्षांना तर नाहीच नाही. पण, शिवाजी विद्यापीठात शिकणाऱया राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुला, मुलींसह ते टिकाव, फावडे घेऊन उतरतात. दुष्काळी हिवतडसारख्या कुठूनच पाणी मिळणार नाही अशा गावात फक्त 22 हजार लीटर पाण्याच्या साठय़ावर वर्षभर डाळींब बाग जगवण्याचा प्रयोग यशस्वी करतात. पंधरा हजारात वर्षभर राबणाऱया रामोशी कुटुंबांना स्वतःच्या शेतीत बागायतदार बनवतात. लोकांना सरकारकडे मागतकरी बनविणारी व्यवस्था पोसण्यापेक्षा लोकांनीच पर्याय शोधून ती प्रत्यक्षात उतरवावीत आणि त्यामध्ये सुशिक्षित वर्गाने बुद्धी, अर्थ आणि शक्तीरूपाने योगदान द्यावे, निर्बलांच्या पाठीशी शक्ती उभी करून त्यांना स्वतः सबल व्हायला लावावे या विचाराने ते झटत आहेत. मराठा मोर्चा उद्या जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा भरकटेल. नामांतरानंतर अनुसूचित जाती आणि आरक्षणानंतर ओबीसी भरकटले. हा इतिहास आहे. पुढे काय करायचे त्याचा कार्यक्रम हवा. त्यांनीही संपतरावांचा हा शाश्वत मार्ग अंगीकारला पाहिजे. दगड फेकत फिरण्यापेक्षा दगडाचे बंधारे बांधून शेती सुधारण्यासाठी  तरुणांना तयार करावे लागेल. विचारसरणी कोणतीही असो आपण संकटराव बनणार की संपतराव हे ठरवण्याची वेळ आली आहे!

शनिवार, २१ जुलै, २०१८

आग्रहाचे अवाहन.....

स्वातंत्र्य चळवळीतील ध्येयवाद,राष्ट्र उभारणीच्या प्रखर प्रेरणेची किनार माझ्या आयुष्याला बालपणापासून मिळत गेली.शालेय जीवनात पुरोगामी विध्यार्थी संघटना आणि शे.का.पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जन चळवळीत सक्रीय राहिलो.१९७२ साली विधानसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी अंगावर आली.या निवडणुकीला विध्यार्थी-युवकांनी उठावाचे स्वरूप आणले.मोठ्या विश्वासाने साथ दिली.तो विश्वास सार्थ ठरावा म्हणून प्रत्येक अडचणीत त्यांच्याबरोबर राहिलो.काही प्रश्न निर्णायक लढवले.काही प्रश्नाबाबत धोरण स्वीकारावे लागले.पन्नास वर्षाहून अधिक काळ सातत्याने झुंजत राहिलो मात्र १९७७ नंतर डावी पुरोगामी,परिवर्तनवादी चळवळ क्षीण क्षीण होत गेली.त्याची कारणे शोधण्याची गरज जाणवू लागली.चळवळ हे माझे एकट्याचे काम नाही.जे काही घडत गेले त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील किमान शंभर हून अधिक शे.का.पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.चळवळीतील खरीखुरी शक्ती तीच होती.या चळवळीचा वृतांत लोकांपुढे सादर करावा.काय चुकलं ते शोधावं.या उद्धेशाने हा प्रवास प्रकाशित करत आहे.

पुस्तकाचे प्रकाशन करताना आज चळवळीतील सर्वांची आठवण येते.त्यांचे चेहरे नजरेसमोर येतात.त्या सर्वांचा उल्लेख करणे शक्य झाले नाही.या प्रवासात एखाद्या पक्षाशी,विचारशी एकनिष्ठ राहून उभे आयुष्य पणाला लावणारी,अखेरच्या श्वासापर्यंत विचार जोपासनारी,तत्वनिष्ठ त्यागी माणसांचा मला सहवास लाभला.तीच माझी प्रेरणा होती.अशा त्यागी,निष्ठावान कालवश नेत्यांचे,कार्यकर्त्यांचे कर्तुत्व विस्मृतीत जावू नये म्हणून त्यांचे सामुहिक स्मारक निर्मिती चा शुभारंभ याप्रसंगी मा.आमदार भाई धैर्यशील पाटील,पेण याच्या हस्ते क्रांतीस्मृतीवनात करण्यात येत आहे.

दुष्काळ निवारण व निर्मुलणासाठी योजलेल्या सर्व उपक्रमास शिवाजी विद्यापिठाची भक्कम साथ लाभली.डॉ.के.बी.पवार,डॉ.माणिकराव साळुंखे,डॉ.एन.जे.पवार,डॉ.देवानंद शिंदे या सर्व कुलगुरुनी एन.एन.एस.ची ताकद दिली.एन.एन.एस.विभागप्रमुख डॉ.डी.के.गायकवाड सरांच्या उत्साही प्रतिसादामुळे कोरडवाहू शेतीत मर्यादित पाण्याच्या सूत्रबद्ध नियोजनातून पर्यावरण पूरक पिकपद्धतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.या सहकार्याबद्दल ‘शिवाजी विध्यापिठाचा सन्मान’ मा.मेधा पाटकर यांच्या हस्ते या निमित्ताने करीत आहोत.

तसेच मी अनेकदा जीवघेण्या आपत्तीत सापडलो.जगणे आणि टिकून राहणे शक्य न्हवते अशा अत्यंत कठीण समयी अनेकांनी निरपेक्षपणे आधार दिला.म्हणून मी तरलो.त्यापैकी प्रातिनिधिक अशा ....
कालवश मा. पी एम औताडे (सर)/शशिकांत औताडे,पुणे  सन १९६०
कालवश भाई डी.बी.जाधव/शरद जाधव,दुधोंडी –सन १९८३-८४
मा.डॉ.राजेंद्र भागवत,निरामय हॉस्पिटल सांगली - सन २०००
कालवश मारुतीराव निगडे/विजय निगडे,कोल्हापूर - सन २०००
मा.कुमार भिडे,पुणे - सन २०००
महात्मा फुले पतसंस्था,नागराळे - सन २०००
मा.विजय परांजपे,पुणे - सन २००६
मा.प्रसन्न मराठे,पुणे - सन २००७
मा.राजेंद्र मदने,पुणे - सन २०१३
मा.नारायण देसाई,गारगोटी - सन २०१३
मा.मोहन देशमुख,मुंबई - सन २०१३
या मान्यवरांचा या प्रसंगी ऋणनिर्देश करण्यात येईल.

दि.१२ ऑगष्ट २०१८ रोजी क्रांतीस्मृतीवनात माझ्या आयुष्यातील मागील ७६ वर्षातील चळवळीचा वृतांत ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकरूपात प्रकाशित होत आहे.या कार्यक्रमात ‘भविष्यात पुरोगामी शक्ती वृद्धींगत कशी करता येईल?’याचे विचार मंथन होईल तरी आपण अगत्य उपस्थित रहावे हि नम्र विनंती
आ. भाई संपतराव पवार

मंगळवार, १९ जून, २०१८

*जाहीर निमंत्रण*
इनामीजमीन,घरासाठी जागा,व बजेट या मूद्द्यावर  सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. *शूक्र*दि. २२ व शनि. २३ जून रोजी (स.११ ते ५) दोनदिवसीय निवासी प्रशिक्षण बलवडी (भा) येथे होत आहे*
सांगली जिल्ह्यातील वतनी जमीनी  महार व रामोशी),गायरान जमीन,कूळकायदा,देवस्थान जमीन ,मूलाणकी,फॉरेस्ट जमीन किंवा अतिक्रमण जमीनी विषयातील अनूभवी तज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.तरी या प्रशिक्षणासाठी आपण निमंत्रित आहात.
संयोजक :अग्रणी सोशल फौंडेशन, विटा
*स्थळ- क्रांती स्मृतीवन बलवडी ( भा) ता.:खानापूर जि. सांगली*
( विटा - कूंडल रोड)*
संपर्क: *सूनीलभाऊ लोंढे*
कार्यशाळा समन्वयक,
:८४११८१५६७६

रविवार, २० मे, २०१८

ऐतिहासिक इस्लामपूर मोर्चात पोलीस गोळीबारात शाहिद झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्फूर्तिदायी स्मारक क्रांतीवनात पूर्णत्वास.....

शुक्रवार, ४ मे, २०१८

रविवार, १५ एप्रिल, २०१८

उपेक्षितांचे प्रतिनिधित्व करणारी दलित चळवळ...
उद्या विट्यात करीत आहे एका उपेक्षिताचा सत्कार....

सोमवार, ९ एप्रिल, २०१८

Battle Against Poverty....
हे आहेत आमच्या दुष्काळ विरोधी युद्धातले 'संताजी-धणाजी..' आणि हा त्यांचा पराक्रम.!
दुष्काळी भागात जन्माला आलेल्या लाखो कुटुंबाना निसर्गानं वाऱ्यावर आणि सरकारनं नशिबावर सोडलं ! या गरीब,कष्टकरी कुटुंबांच्या दये पोटी हजारो कोटी रुपये खर्चून इथं पाणी आलं.पण राज्यकर्त्यांनी हे पाणी निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन एकराला नव्वद लाख लिटर पाणी लागणाऱ्या उसासारख्या पिकाला प्रोत्साहन देऊन सम्राटांना पोसण्यासाठी वापरलं.एका बाजूला भांडवलंदाराला गब्बर आणि गरीबाला भिकारी बनवणारी विकासाची ही नीती आणि दुसऱ्या बाजूला दिव्यांचा झगमगाटातली काँक्रीटच्या जंगलातली माणसं सगळ्यांचाच विकास झाल्याच्या धुंदीत असताना....
याच विकासाचा टेम्भा मिरवणाऱ्या रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीत धनाजी मंडले आणि रघुनाथ मंडले ऊस ओढत होते.परमेश्वराने याना डोंगरावर जन्माला घातलं.वीज,रस्ता नसणाऱ्या दुर्गम ठिकाणी नशिबानं जमीन आणि डोळ्यात तेव्हढंच पाणी दिलं..!!
आपल्यासारख्या सहकाऱ्यांनी हाक दिली आणि हे संताजी-धनाजी या गरिबीविरुद्धच्या लढाईत घुसले.डोंगर फोडून काढला.परिस्तिथीवर तुटून पडले.वाट्याला आलेल्या निसर्गाला शरण जाऊन निसर्गानेच सुचविलेला मार्ग धरला.दुष्काळाला पूरक अशा डाळिंबाची बाग लावली.जीव तोडून जपली.लाडक्या लेकराला मांडीवर घेऊन चमच्याने भरवावं तस यानी या डाळिंबाला पाणी पाजलं.दैव लाजलं!कष्टाला फळ आलं!!
केवळ पंच्याऐंशी हजार लिटर पाणी वापरून त्यांना डाळिंबाचे एक लाख रुपये उत्पन्न मिळाले आणि सात पिढ्यात पहिल्यांदा यांची पोरं बाळं यंदा शाळेत गेली....
एक लाख लिटर पाण्याची खात्री दिल्यानं अशी अनेक कुटुंब आपण कायमची सुखी समाधानी,आनंदी आणि स्वावलंबी करू शकलो आहोत.
या आता आपण मिळुन...
नशीबाच्या फेऱ्यात अडकलेल्या गरिबांच्या पदरात दान टाकून त्यांना पांगळ बनवण्यापेक्षा राबणाऱ्या अशा लोकांना मदत करून त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम बनवूया...
दुःख,दारिद्र्यात पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्यांची काळजी घेऊया....
Helping one person might not be change the whole world but it could change the world of one person.!!
आ.अँड.संदेश पवार
समन्वयक,उगम फौंडेशन, बलवडी.8888498088 krantivan.com/ugamfoundation@gmail.com




रविवार, १ एप्रिल, २०१८

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

सांगली विकास प्रतिष्ठाणची आ
गळी वेगळी शिवजयंती

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना हृदयनाथ सावंत ,भाई संपतराव पवार,प्रतापराव गुजर यांचे वंशज तहसिलदार विश्वासराव गुजर, प्रा. डाॕ. सुधीर इंगळे, सरपंच महादेव जाधव


मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

जुगलबंदी...३० जाने,२०१८
दर्जा नसलेल्या लोकांकडून राजकारणाचा दर्जा सुधारायची अपेक्ष्या करण्यापेक्षा आता दर्जेदार लोकांनी राजकारणात यावं-खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत.
राजकारण्यांनी राजकणातली तत्व पायाखाली आणि byurocracy डोक्यावर घेतली-भाई सुभाष (बापू) पाटील.
विधायकतेला राजकारणाची जोड नसली की विधायकता वांझ ठरते आणि राजकारणाला विधायकतेची जोड नसली की राजकारण वांझ ठरते-भाई संपतराव पवार


शनिवार, २७ जानेवारी, २०१८

Bhai sampatrao pawar was born on June 1, 1942, in the atmosphere of great tradition of varkari samprday and influence of prtisrkar and styshodhak movement.His father Govindrao Pawar was an active participant in the freedom struggle under the leadership of Krantisinh Nana Patil. After independence, they were working in the shetakri kamgar  Party for the betterment of society and nation building. Due to the environment of such surrounding movement , sampatrao pawar  were attracted to social work from childhood.
Inspired by the influence of the Russian Revolution and Marxist ideology, it became active in the social work since being students. With the establishment of the state-wide 'purogami vidhyrthi sanghtana', they succeeded in resolving the problems of the students. Many historic movements that have made ameliorative changes in the state's policy by establishing the 'Mukti Sangharsh movement' have been successful. He got a new direction from Mani Bhavan Mumbai, 'Gndhichya chotya gosthi'' Hind Swarajya', and 'Satyache prayog'.
They received inspiration, fellowship and guidance from  Mukundrao Kirloskar, G. P.Pradhan, B. N. Rajhans, Karmaveer Baba Amte, Malati Chinchalikar, Shirubhau Limaye, Anutai Limaye, Mohan Dharia, Vasant Bapat, Liladhar Hegde, Justice Chandrashekhar Dharmadhikari, Usha Mehta, Medha Patkar, Sanjay Sangawai, Sulbha  Bramha, Ram Bapat, Baba  Adhav, Nilu Phule etc. That's why he did tremendous work in the field of movement, awakening, research, eradication of drought, nature conservation, water conservation, human resources development and youth development.
He has completed innovative creative projects like Biliraja Smriti Dam, Agrani Rever Revival Project, Drought Redressal Program, Poverty Alleviation Program(BAP), Baba Amte Tyre dam, krantismrutivan, without taking any financial help from the government.
The thoughts of Gandhian had a great empact on their lives. it is still alive in his style of dressing, acting and speaking. By adopting Gandhiji's thoughts, he had deliberately shared Gandhiji's thoughts in the rural areas with constructive work. He has not accepted any unjustified agreement and financial support from the government, but he has created many social development projects in rural areas directly from the people's participation. They opened several new ways that can make all-round transformation of rural India. He contributed immensely in the movement and struggled against drought. Many innovative concepts needed for the development of the national integration and the progress of the intellectual and physical development of the society has been implemented under his valuable guidance through ugam foundation and krantismrutivan
There should be a minimum gap between your speaking and behaving,Bura mat bolo, bura mat suno, buramat bolo, Creation can serve everyone's needs but not fulfil anyone's greed, considering such principles of Mahatma Gandhi, he is looking for the share of sustainable development even during the 75th year of age

बुधवार, २४ जानेवारी, २०१८

सातारा प्रतिसरकरच्या इतिहास जागर दिनाच्या व्याख्यानात जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यानी जलनायक भाई संपतराव पवार यांचा आदर्शवाद अभिमानाने मांडला...

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

२०१८ ची पहिली संकल्पपूर्ती.....
१ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे पूर्ण.!
सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार..!!

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

जेष्ठ पत्रकार शांताराम कुंभार यांच्या सौजन्याने
जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेते विलास रकटे यानी क्रांतिस्मृतीवनाला सदिच्छा भेट देऊन मौलिक मार्गदर्शन केले.याप्रसंगी मा पत्रकार शांताराम कुंभार,मा आनंदराव(बापू)पवार,मा बाबुराव (आबा)पवार,कास्कर सर 
देवनाना आदी उपस्थित होते.

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

लाख मोलाची शाल....
गरीब या शब्दातली वेदना,दुःख समजायला गरिबीतच जगावं लागतं. गरिबांनी स्वप्न बघावी,ती साकार करताना जळावं ही वाटते तितकी सोपी लढाई नाही.पण काही असामान्य माणसं परिस्थितीच्या उरावर बसून तिची पाठ लावतात. महाराष्ट्र केसरी पै नारायण साळुंखे हा त्यातलाच एक पठया..! तसं बघायला गेलं तर गरीब आणि पैलवान हे दोन विरुद्ध अर्थी शब्द.पण दादांनी या शब्दानाच समानार्थी बनवलं. सबंध आयुष्याची तालीम झाली तरी त्यांनी आखाडा सोडला न्हाय.आता पलूस तालुका कुस्ती संघ स्थापन करून नव्या पोरांना शिकवायचं ठरवलं पण दुर्दैवाने त्यांना कायद्याच्या कटकटीत अडकवल गेलं.माझ्यासारख्या खारीचा हातभार लागला आणि ते निसटले.मी मोबदला घेता घेत नाही म्हणून आज त्यानी पैलवान डाव टाकला.फुल नाही तर  फुलांचा अख्खा दस्ता आणि अंगावर शाल टाकून आभार मानले.!
पण मित्रानो मला ती शाल महाराष्ट्र केसरीच्या गदे इतकीच जड वाटली.....

सोमवार, १ जानेवारी, २०१८

घेतला वसा टाकू नये...
आम्ही राबनारांच्याच बाजूचे..!
माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यलयावर शेतकरी कष्टकरी यांना पेन्शन मिळावी म्हणून आज १जानेवारी २०१८ या मागणीसाठी आयोजित मोर्चात चळवळीचे नेते जलनायक भाई संपतराव पवार यांनी भूमिका मांडली..